in

108 वर्षीय लढवय्या आजींचा जयंत पाटलांनी केला सत्कार

कोरोना काळात अनेकांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मग ती लसी संदर्भात असो अथवा कोरोना आजारा संदर्भात असो. मात्र सांगलीच्या 108 वर्षीय आजींनी या सर्व संभ्रमांना बळी न पडता कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले. या त्यांच्या लढवय्या वृत्तीचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी कौतुक केले.

कोरोना आजाराच्या कहरामुळेच भल्याभल्यांना घाम फुटला आहे. अनेकांनी कोरोना प्रतिबंधक लसी घेणे ही टाळली. या सगळ्यात सांगलीच्या इस्लामपूर शहरातील टकलाईनगर येथील १०८ वर्षीय जरीना अब्दुल शेख अपवाद ठरल्या आहेत. जरीना शेख यांनी कोरोनाला जवळपास तर फिरकू दिलेच नाही.. उलट लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून जिद्दीने लढण्याचा एक सामाजिक संदेशही दिला आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगलीचे पालकमंत्री यांनी आज दोन्ही डोस पूर्ण केल्याबद्दल १०८ वर्षीय जरीना अब्दुल शेख यांचा साडी चोळी देऊन सत्कार केला.

जयंत पाटील यांचा आपल्या मतदारसंघातील लोकांसमवेत असलेला ऋणानुबंध हा सर्वश्रुत आहे.याच ऋणानुबंधामुळे मंत्री जयंत पाटील यांना पाहताच जरीना आजीने ‘लवकर आलास…’ अशी हाक देत विचारपूस केली. यावेळी जयंत पाटील यांनीही त्यांच्या या हाकेला मुलाप्रमाणे प्रतिसाद त्यांची विचारपूस केली. या संदर्भातील अनुभवही त्यांनी ट्वीटरवर शेअर केले.

आमच्या इस्लामपूर येथील जरीना आजीने लसीचे दोन्ही डोस आज पूर्ण केले आहेत.लढण्याची आणि जगण्याची जिद्द काय असते हे आज जरीना आजीने दाखवून दिलं. लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी शस्त्र आहे.त्यामुळे प्रत्येकाने लसी घ्यावी आणि कोरोनाला पराभूत करावे असे आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘‘क्या गुंडा बनेगा रे तू?”, वसीम जाफरनं इंग्लंड संघाला केलं ट्रोल

व्हायरल व्हिडीओ मारहाण प्रकरण; गजानन बुवा चिकणकर यांच्यावर गुन्हा दाखल