in

‘भाजप नेते बोलतात मग एनआयएकडून माहिती येते, हा काय प्रकार?’

आधी भाजपचे नेते बोलतात त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) माहिती बाहेर येते. त्यामुळे तपास सुरू आहे की राजकारण, असा प्रश्न निर्माण होतो. या सर्व प्रकाराचा अभ्यास करण्यासारखी परिस्थिती निर्माण होतीये, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

भाजप नेत्यांनी दोन दिवस थांबा, अजून एक विकेट पडणार आहे, अशा आशयाचं भाष्य करणं. त्यानंतर एनआयएच्या अटकेत असलेल्याचं पत्र प्रसारमाध्यमांना प्राप्त होणं. त्यात एक दोन नावं समाविष्ट होणं, हा काय प्रकार आहे, असा सवालही जयंत पाटलांनी केला.

आता जे पत्र बाहेर आलं आहे त्यावर मंत्री अनिल परब यांनी स्पष्टिकरण दिलं आहे. इतर नावं घेतली असतील, तर त्यात तथ्य आहे की नाही, हे पत्र वाचल्यावरच कळतं. त्यामुळे यामागे भाजपचं राजकारण आहे, हे राज्य सरकारच्या लक्षात आलं आहे, असंही पाटील म्हणाले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘मुंबईत केवळ एक दिवसाचा लससाठा शिल्लक’

अहमदाबादच्या शाळेत आग; ४ मुलं अडकली