in

जयंत पाटलांचं पावसात भाषण; पवारांच्या ‘त्या’ सभेची आठवण

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादीकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. सभा सुरू असताना पाऊस सुरू झाला. मात्र, पाटील यांनी भर पावसात भाषण सुरूच ठेवलं. यावेळी उपस्थितांना शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली.

जयंत पाटील यांनी मंगळवेढा तालुक्यातील सलगर बु. इथं सभा घेतली. यावेळी पाऊस सुरू झाला. यावेळी पाटील भाजपावर तुटून पडले. भाजपच्या लोकांना वेड लागलं आहे. पाण्याविना मासा तडफडतो, असंही ते म्हणाले.

शरद पवारांची पावसातील ही सभा प्रचंड गाजली होती.

शरद पवारांची ‘ती’ सभा –

शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान साताऱ्यात सभा घेतली होती. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपात प्रवेश केला होता. यावेळी साताऱ्यात पवारांची सभा सुरू असताना पाऊस सुरू झाला. भर पावसात पवारांनी भाषण केलं होतं. त्यावेळी ही सभा प्रचंड गाजली होती. या सभेनंतर उदयनराजे यांचा पराभव झाला होता.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शरद पवारांवर आज ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया

साप्ताहिक राशीभविष्य; गुढीपाडव्याच्या या आठवड्यातील विविध योग आणि राशी बद्दल परिणाम जाणून घ्या