in

JEE Advanced Exam 2021 । ‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ परीक्षा ३ ऑक्टोबर होणार

‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ ही परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली आहे. तसेच, सर्व कोविड प्रोटोकॉलचे पालन करून ही परीक्षा घेतली जाईल, असे देखील सांगण्यात आले आहे.

आयआयटीसह विविध केंद्रीय संस्थांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा साखळीतील ‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ ही परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जेईई मुख्य परीक्षा आणि जेईई अ‍ॅडव्हान्स अशा दोन परीक्षा घेण्यात येतात. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलल्यानंतर, जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“साहेब… पोरंबाळं वाट बघत असतील, सोडा आम्हाला”

“आणि काय हवं”चा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…