in

जेफ बेझोस यांची अवकाशाला गवसणी, भावासह रचला इतिहास

अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस यांनी मंगळवारी अंतराळात सफर केली. मगील आठवड्यात
गेल्या आठवड्यात अब्जाधीश उद्योगपती रिचर्ड ब्रॅन्सन (वय ७०) यांनी पाच सहकाऱ्यांसह ‘व्हीव्हीएस युनिटी’ या विमानातून अवकाशात उड्डाण करत अवकाश पर्यटन क्षेत्राची दारं उघडली होती. आता बेझोस यांच्या उड्डाणानंतर आणखी पुढची पायरी चढण्यात आली आहे.

बेझोस यांच्याबरोबर त्यांचे भाऊ मार्क बेझोस, ‘नासा’च्या माजी महिला अंतराळवीर वॅली फंक (वय ८२) आणि वैमानिक ऑलिव्हर डेमेन (वय १८) यांनी अंतराळाचा अनुभव घेतला. बेझोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीच्या माध्यमातून ही अवकाश पर्यटन मोहीम आखली होती. ‘न्यू शेफर्ड’ कुपीतून या पर्यटकांनी शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेतला. बेझोस यांचे हे उड्डाण संपूर्णपणे स्वयंचलित होते.

या अवकाश सहलीसाठी २० जुलै ही तारीख निश्‍चित करण्यामागेही एक विशेष कारण होते. ५२ वर्षांपूर्वी अपोलो ११ हे अवकाश यान याच दिवशी चंद्रावर उतरले होते. या ऐतिहासिक दिवसाची आठवण यानिमित्ताने जागवण्‍यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोल्हापुरला हाय अलर्ट; डोंगरी भागात सतर्कतेचा इशारा

‘बर्ड फ्लू’मुळे दिल्लीत बालकाचा मृत्यू