in

म्हाडाचं ताडदेव हॉस्टेल महिलांसाठी राखीव… एक हजार महिलांसाठी सुविधा

‘म्हाडा’चे ताडदेव हॉस्टेल महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे.

ताडदेव येथे 1000 नोकरदार महिलांची राहण्याची व्यवस्था होईल असं सुसज्ज वसतिगृह उभारण्यात येत आहे. नोकरदार महिलांसाठीचंच हे वसतिगृह असणार असून येत्या दीड ते दोन वर्षात हे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. या वसतिगृहासाठी 35 कोटी खर्च येणार असून सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असं हे हॉस्टेल असणार आहे, असं आव्हाड म्हणाले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार हे वसतिगृह उभारण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

या वसतिगृहाची जबाबदारी म्हाडा घेणार आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. म्हाडा कोरोना काळात कुठलीही जबाबदारी घेण्यास तयार आहे. लोकांना वाचवण्यासाठी त्यांना संरक्षण देण्यासाठी जेजे हवे ते करू, असंही ते म्हणाले.

त्याच प्रमाणे लॉटरी विजेत्यांना कुठलीही अतिरिक्त रक्कम भरावी लागणार नाही. म्हाडाने तो निर्णय परस्पर घेतला होता. तो आम्ही अमान्य करतो, असंही ते म्हणाले. त्यामुळे म्हाडाच्या लॉटरी विजेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IPL 2021 MI vs KKR: सामना कधी, कुठे, केव्हा?

West Bengal Election | निवडणूक आयोगाची भाजपा नेत्यावर मोठी कारवाई