अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. विमानाच्या पायऱ्या चढताना बायडन ३ वेळा पडले आहेत. यात त्यांना दुखापत झाली नाही. एअर फोर्स वन या विमानात चढताना हा प्रकार घडला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी एअर फोर्स वन विमान असते. हे विमान जगातील सर्वात सुरक्षित आणि आलिशान समजलं जातं. बायडन यांचा पाय पायऱ्यांवरून घसरला. मात्र, ते आता १०० टक्के बरे आहेत, असं व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलं आहे.
बायडन पायऱ्यांवरून घसरल्याचा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे. विमानात चढताना पाय घसरल्यामुळे बायडन पडले होते. सावरून उठत असताना ते पुन्हा पडले. त्यांनी स्वत:ला सांभाळलं आणि पुढे चालू लागले, तर दोन पायऱ्या होत नाहीत तोच तिसऱ्यांदा पाठीवर पडले. यानंतर उठून ते चालत वर गेले आणि मागे वळून सॅल्यूट केला.
Comments
Loading…