in

“मी चार वेळा मंत्रिपद नाकारलं आहे”

मंत्रिपदाच्या चर्चेबद्दल आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी भूमिका मांडली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पिंपळनेर येथे खावटी कीट वितरण सोहळ्याच्या निमित्ताने, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आपण चार वेळेस मंत्रिपद नाकारलेलं आहे, त्यामुळे मंत्रिपद जाणार अशा बातम्यांचा आपल्याला राग येत नसल्याचं पाडवी यांनी स्पष्ट केला आहे. मंत्रिपद काढायचं असेल तर पंधरा किंवा नऊ ऑगस्ट रोजी काढावं, असे मिश्कीलपणे त्यांनी सांगत, चिमटा काढला आहे.

पक्षाचे वरिष्ठ जे ठरवतील तो निर्णय आपल्याला मान्य राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. मंत्रिपद जाईल या मीडियातल्या बातम्या असून, आपण पक्षश्रेष्ठींना याबाबत विचारणा केली असता त्यांनाही याबाबत माहित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

What do you think?

Written by Lokshahi News

IND vs SL | टीम इंडियाची दमदार सलामी… श्रीलंका बेचिराख!

पावसाचे मृत्यूतांडव! पावसामुळे ३१ बळी; मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी