in

कालनदीच्या पात्रात दुषित पाणी सोडल्याचा प्रकार; जिल्हा प्रशासन करतेय तक्रारीकडे दुर्लक्ष

भारत गोरेगावकर | माणगाव तालुक्‍यातील कालनदीच्या पात्रात दुषित पाणी सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. या संदर्भात ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडेही तक्रार केली आहे. मात्र या तक्रारीकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप आता ग्रामस्थ करत आहेत.

निजामपूर भागात असलेल्या पोस्को स्टील या नामांकित कंपनीकडून दूषित पाणी कालनदीच्या पात्रात थेट सोडले जात आहे. या घटनेमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत आहे. या संदर्भात कापडे ग्रामपंचायतीने जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र जिल्हा प्रशासन या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थ हवालदिल झालेत.

दरम्यान रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केल्यानंतर रायगड पोलीसांनी नुकतीच कारवाई करत दुषित पाणी सार्वजनिक रस्त्यावर उघडपणे गळती करणारा टॅंकर पकडला होता. मात्र अद्याप ही समस्या सुटली नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने याकडे लक्ष देऊन ठोस कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मंत्री आदित्य ठाकरेंची बैठक सुरू असताना स्लॅब कोसळला…

बदलापुरात गॅस गळती; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मोठी कारवाई