उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर स्फोटकांना भरलेल्या वाहन मालकाच्या मृत्य प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी वारंवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे यात काहीतरी काळंबेरं आहे आणि हे आम्ही तपासातून उघड केल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी करत असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपास एटीएसकडे सोपवत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली.
यावेळी ठाकरे म्हणाले, “यापूर्वीच हा तपास आपल्या गृहमंत्र्यांनी एटीएसकडे दिला आहे. या सगळ्या यंत्रणा कोणा एकट्याची मक्तेदारी नसतात. सरकार येतं तेव्हा यंत्रणा तीच असते. स्वत:वर आत्मविश्वास असावा लागतो तो आमच्याकडे आहे, प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणेवर विश्वास असावा लागतो तोदेखील आमच्याकडे आहे आणि म्हणून एटीएसकडे हा तपास दिला आहे. पण एनआयएकडे हा तपास देण्याचा डाव केंद्राचा असेल तर याच्यात काहीतरी काळंबेरं आहे आणि हे आम्ही तपासातून उघड केल्याशिवाय राहणार नाही”.
Comments
Loading…