बॉलीवूड विश्वातील काही लोकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करणं तसं दुरापास्तच आहे. मात्र, अभिनेता कमाल खान ह्यानं टि्वट करत आरएसएसवर निशाणा साधला आहे. ‘देशात केवळ आरएसएसवालेच देशभक्त आहेत आणि बाकी सर्व देशद्रोही बनले आहेत, असा आरोप कमाल खाननं केला आहे.
कमाल खानचं टि्वट काय आहे?
अनेकदा समजून घेण्याचा प्रयत्न करतो की, काय खरं आहे? काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे? परंतु, याचं उत्तर मिळत नाही. प्रत्येक भारतीयाला तो ब्रिटिशांच्या अमलाखाली होता, हे माहिती आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यास नकार दिला. सरदार पटेल यांनीही RSS वर बंदी आणली होती. पण, आज केवळ रा. स्व. संघवाले तेवढे देशभक्त म्हणवून घेत आहेत आणि बाकी सगळे देशद्रोही ठरताहेत. असं टि्वट कमाल खाननं केलं आहे.
Comments
Loading…