in ,

Kangana Ranaut | कंगनाचं ट्विट; लॉकडाऊनवरून महाराष्ट्र सरकारला अप्रत्यक्ष टोला

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये ट्विटरवॉर होतच असतात. त्यात काय नवीन नाही. मात्र आता कंगना रनौतने राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनवर नाव न घेता टीका केली आहे. या संदर्भात तिने ट्विटही केले आहे.

कंगना बर्‍याचदा सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकारबद्दल वक्तव्य करत असते. यावेळी आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारबद्दल ट्विट करत जोरदार हल्लाबोल केला आहे.कंगना रनौतने ट्विटवर एका दरवाजाचा फोटो शेअर केला आहे. हा दरवाजा समोरपासून बंद आहे. परंतु, हा दरवाजा सर्व बाजूंनी खुला आहे. हा दरवाजाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “महाराष्ट्र लॉकडाऊनमध्ये असा आहे”. ज्यानंतर अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आली आहे.

दरम्यान गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार मुंबईतील कंगनाच्या कार्यालयातील बरेच अनधिकृत बांधकामाची तोडफोड करण्यात आली होता. ज्यानंतर अभिनेत्री सतत उद्धव सरकारवर कडक टीका करत असते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Kartik Aaryan | ‘दोस्ताना 2’ मधून कार्तिक आर्यन आऊट

केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण