in

Maratha Reservation : इंद्रा सहानी निकाल ‘लक्ष्मणरेषा’ नाही… कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या सुनावणी दरम्यान, संसदेने १०३ वी घटनादुरुस्ती करून आर्थिक दुर्बल सवर्णांना १० टक्के आरक्षण दिले असल्याने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली असून आता आरक्षणाच्या मर्यादेसंदर्भात इंद्रा सहानी निकाल हा ‘लक्ष्मणरेषा’ मानता येणार नाही, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मंगळवारी केला.

१०२ व्या घटनादुरुस्तीमुळे मागास समाज निश्चित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यांना मागास समाजाची यादी तयार करण्याचा अधिकार आहे का, या अनुषंगाने न्यायालयात बाजू मांडली जात आहे.

१०३ व्या घटनादुरुस्तीमुळे आर्थिक निकषावर १० टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या दुरुस्तीमुळे इंद्रा सहानी निकालाने घालून दिलेली आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. मग इंद्रा सहानी निकाल हा ‘लक्ष्मणरेषा’ कसा ठरेल, असा सवाल सिब्बल यांनी न्यायालयात उपस्थित केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

धनंजय मुंडे दुसऱ्यांदा ‘पॉझिटिव्ह’

Petrol and Diesel price | पाहा आजचे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती