in

Karnataka CM: ‘मुख्यमंत्री पद सोडतो, पण तीन अटी मान्य करा’

मुख्यमंत्री बीएस येडीयुराप्पा (bs yediyurappa) यांची खुर्ची धोक्यात आली असून गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या बंडाळीमुळे भाजपाने दुसऱ्या नेत्याला नेतृत्व देण्याचा निर्णय पक्का केला आहे. काँग्रेस-निजदला सत्तेवरून खाली खेचत येडीयुराप्पांनी भाजपाची सत्ता स्थापन केली होती. परंतू त्यांची एकाधिकारशाही भाजपाच्या अन्य नेत्यांना रुचली नसल्याने काही काळातच त्यांच्याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त होऊ लागली होती.

भाजपामध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु झाल्या असून राज्यात लिंगायत समाजाचे वर्चस्व असल्याने त्याच समाजाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

येडींनी दिल्लीच्या नेत्यांसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. खासदार असलेला मोठा मुलगा बी.एस राघवेंद्रला केंद्रात मंत्रिपद, दुसरा मुलगा बी.एस. विजेंद्र याला राज्यात मंत्रिपद आणि मुख्यमंत्री मी सांगेन तोच, अशा या अटी आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विक्रोळी इथं दरड कोसळली; ३ जणांचा मृत्यू

India vs Sri Lanka, 1st ODI live | आज भारत विरुद्ध श्रीलंका सामना रंगणार