in ,

कार्तिक आर्यन आणि क्रिती सनॉन पुन्हा एकदा एकत्र दिसणार

अभिनेता कार्तिक आर्यन सध्या आपल्या आगामी चित्रपटांच्या एका मागे एक घोषणा करत आहे. यामध्ये त्या आता रोहित धवन यांच्याद्वारे दिग्दर्शित त्याचा आगामी चित्रपट ‘शहजादा’ची घोषणा हा या वर्षीचा त्याच्या तिसरा चित्रपट आहे, ज्यावर तो काम करतो आहे.

या चित्रपटात तो आपली ‘लुका छुपी’ची सह-कलाकार कृति सेननसोबत दिसणार असून अभिनेता अल्लू अर्जुनने ओरिजनल चित्रपट ‘अला वैकुंठपुरमुलु’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. २०२० मधली सर्वात मोठ्या हिट चित्रपटाला हिंदी दर्शकांसाठी पुन्हा बनवण्यात येत आहे. कार्तिकने या आधी अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमुलु’मधील गाणे ‘बुट्टा बोम्मा’वर एक डांस व्हिडीओ शेअर केला होता आणि आता, ‘शहजादा’च्या घोषणेने चाहत्यांचा उत्साह वाढवला आहे. कार्तिक आर्यनने आपल्या सोशल मीडियावर याची घोषणा करताना लिहिले,”#Shehzada जगातील सर्वात गरीब प्रिन्स

‘शहजादा’ चित्रपटात मनीषा कोइराला आणि परेश रावल हे देखील सहायक भूमिकेत असणार आहेत. आपले टाइटल, टैग लाइन, कार्तिक आर्यन यांच्यामुळे हा रीमेक दमदार होणार आहे. लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता असून ४ नोव्हेंबर, २०२२ ला प्रदर्शित होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सिटी सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आनंदराव अडसूळ यांना न्यायालयाचा झटका

लाचलुचपत विभागाची कारवाई; रेल्वे पोलीस उपनिरीक्षक गोपिका मानकर यांना अटक