in

2020-21 या आर्थिक वर्षात KDMC ची विक्रमी वसुली

2020-21 या आर्थिक वर्षात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने 427.50 कोटी विक्रमी वसुली केली आहे. पालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाने दि.31 मार्च रोजी एका दिवसात तब्बल 10. 78 कोटींची वसूली करून या आर्थिक वर्षात एकूण 427 कोटीहून अधिक वसुली केली आहे. ही वसुली महापालिकेच्या इतिहासातील विक्रमी वसूली असल्याचा प्रशासनाने दावा केला आहे.

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक व त्यांच्या कर्मचारी वर्गाने देखील पाणी बिलांच्या वसुली पोटी एकूण 66.94 कोटीची वसुली केली आहे. गतवर्षी ही वसूली 61.10 कोटी इतकी होती.

15 ऑक्टोबर 2020 ते 15 जानेवारी 2021 या 3 महिन्याचे कालावधीकरीता 75 % व्याज माफीची अभय योजना कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आली होती

सूर्यवंशी यांच्या कणखर नेतृत्वामुळे ही करवसुली झाली असली तरी शहरातील पाणी, रस्ते व कचरा समस्याही लवकरात लवकर मार्गी लावाव्यात अशी अपेक्षा करदाते नागरिक करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ambedkar Jayanti|डॉ. आंबेडकरांच्या 130 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल ही सार्वजनिक सुटी जाहीर

दिया मिर्झाच्या आयुष्यात नवी चाहूल