in

“नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी भरलेल्या करातून माल काढला गेला”

मुंबईत जोरदार मान्सून बरसत असल्याने सर्वत्र रस्त्यांवर पाणी साचलं आहे. दरवर्षी हेच दृष्य पाहायला मिळतं. सर्वसामान्यांची त्रेधातिरपीट उडते. द्यापही अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. तर, हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता विरोधकांकडून राज्य सरकार तसेच मुंबई मनपावर जोरदार टीका केली सुरू आहे.

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील या मुद्यावरून निशाणा साधला आहे. “पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. १०४ टक्के गाळ काढल्याचा दावा केला गेला पण नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी महापालिकेला भरलेल्या करातून माल काढला गेला. १०० कोटीच टार्गेट असणारा १ सचिन वाझे सापडला पण असे सचिन वाझे ठिकठिकाणी असल्यावर सर्वसामान्य मुंबईकराच्या नशिबी तुंबलेली मुंबई” असं केशव उपाध्ये यांनी ट्विट केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Baba ka Dhaba | ‘बाबा का ढाबा’ पुन्हा स्टॉलवर

Euro Cup 2021 स्पर्धेचे वेळापत्रक आले समोर