in

केव्हिन पीटरसनचं ‘हिंदी’ ट्वीट व्हायरल; भारतवासियांना केले आवाहन

आयपीएलचे समालोचन करणारा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनचे एक हिंदीतले ट्वीट फार व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये त्याने कोरोना परीस्थितीवर भाष्य केले असून भारतवासियांना आवाहन केले आहे. या ट्वीटवर त्याच्या प्रचंड रीट्वीट केले जात आहेत.

कोरोनाच्या विषाणूने बायो बबलला भेदल्यानंतर बीसीसीआयला आयपीएलचा १४वा हंगामही स्थगित करावा लागला. त्यानंतर खेळाडू, सपोर्ट स्टाफ, समालोचक सर्वच मायदेशी परतले. असाच इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने मायदेशी परतला असून भारताच्या परिस्थितीवर हिंदीतून ट्वीट केले आहे.

या ट्वीटमध्ये तो म्हणतो, ”मी भारत सोडला असला, तरीही मी या देशाचा विचार करीत आहे. कारण या देशाने मला खूप प्रेम आणि आपुलकी दिली आहे. कृपया सुरक्षित राहा. ही वेळ निघून जाईल, परंतु तुम्हाला सावधगिरी बाळगली पाहिजे.”

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात लॉकडाउन वाढणार ?

अर्जुन पुरस्कार विजेती सारिका काळे अडकणार लग्नबंधनात!