in

चिपळूणसह खेर्डी जलमय; २००५ पेक्षा भयंकर परिस्थिती

चिपळुणात ढगफुटी झाली असून मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी, शिव नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. वाशिष्ठी नदीचे पाणी शहरात शिरले आहे. पुराने चिपळूण सह खेर्डी परीसर व्यापून टाकला आहे. यामुळे जुलै २००५ पेक्षा भयंकर स्थिती निर्माण झाली आहे.

अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. अनेक कुटुंबे सध्या अडकली आहेत. पेढे येथे एका घरावर दरड पडून चारजण जखमी झाले आहेत. खेर्डी दातेवाडी येथे एक कुटुंब पुराच्या पाण्यात अडकले असून यामध्ये सहा महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. चिपळुणात महापुरामुळे हाहा:कार माजला आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कसारा घाटात दरड कोसळली, या ट्रेन्स रद्द

शेतातील माल बाजारात पोहोचविण्यासाठी रस्ते योजना