in

भारतात कोविडमुळे दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळले

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

देशात गुरुवारी आतापर्यंतची उच्चांकी रुग्णसंख्या नोंदवली गेली. तर १०३८ जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर पडलेली असताना भारतासाठी आणखी एक धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात जूनमध्ये दररोज २ हजार ३२० जणांचा मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

दररोज कोरोना बाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असून, आरोग्य यंत्रणांवर असह्य ताण पडताना दिसत आहे. तर दुसरीकडे बेडपासून ते इतर आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. देशातील अशी परिस्थिती असताना आता आणखी एक भयावह अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दररोज १ हजार ७५० लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात दररोज २ हजार ३२० लोक कोविडमुळे मरण पावतील, असं इंडिया टास्क फोर्स सदस्यांच्या आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे. ‘लॅन्सेट’मध्ये हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Medical Oxygen | ऑक्सिजनचा तुटवडा, परदेशातून आयातीचा केंद्राचा निर्णय

CBIचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचे निधन