in

लखीमपूर खेरी हिंसाचार : मंत्रिपुत्र आशिष मिश्राला अटक

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात मोटारी घुसवून केलेल्या हिंसाचाराप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष ऊर्फ मोनू याला शनिवारी रात्री अटक करण्यात आली.

हिंसाचारप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असलेला आशिष शनिवारी सकाळी १०.३० वाजता उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष चौकशी पथकापुढे हजर झाला होता. पोलीस उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील नऊ अधिकाऱ्यांच्या विशेष चौकशी पथकाने त्याची सुमारे ११ तास चौकशी केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात मोटारी घुसवून हिंसाचार घडवण्यात आला होता. त्यात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. गुन्ह्यातील आरोपी आशिष ३ ऑक्टोबरच्या हिंसाचारानंतर फरार झाला होता. या प्रकरणाच्या सदोष हाताळणीवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर दबाव वाढला होता. सर्वच विरोधी पक्षांनी आणि देशभरातील शेतकरी संघटनांनी आरोपी आशिषच्या अटकेची मागणी केली होती. अखेर तो शनिवारी सकाळी पोलिसांपुढे हजर झाला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

108MP कॅमेरा आणि मजबूत चिपसेटसह हा स्मार्टफोन लवकरच होणार लाँच

सुबोध जयस्वाल यांना नोटीस; 14 ऑक्टोबरला हजर राहण्याचे निर्देश