in

Fodder Scam Case : लालू प्रसाद यादव जेलबाहेर… अखेर जामीन मंजूर

चारा घोटाळ्यात शिक्षा भोगत असलेल्या लालूप्रसाद यादव यांना झारखंड हायकोर्टाने जामीन मंजूर केलाय. एक लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांची मुक्तता करण्यात येणार आहे. त्यामुळे चारा घोटाळा प्रकरणात एक वर्षापासून शिक्षा भोगत असलेल्या लालू यादव यांना मोठा दिलासा मिळालाय.

चारा घोटाळाप्रकरणी दोषी आढळल्यानंतर २०१३ मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांना जामीन मिळाला होता.

यानंतर पुन्हा २३ डिसेंबर २०१७ मध्ये चारा घोटाळ्याशी संबंधित कोषागार भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांना बिरसा मुंडा जेल मध्ये पाठवण्यात आले होते. अखेर आज लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या, आरोग्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

Maharashtra Corona : आता तरी घरी बसा… राज्यात दिवसभरात ६७ हजार १२३ रुग्ण, तर ४१९ जणांचा मृत्यू