in

वाईत कुरुंढे आणि देवरुखवाडी इथं भुस्खलन; 5 घरं ढिगाऱ्याखाली

प्रशांत जगताप | वाई तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या कोंढावले नजीक देवरुखवाडी येथे मोठ्या प्रमाणात भुस्खलन झाले असून 4 ते 5 घर मातीच्या ढिगाऱ्यात गाढली गेली असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत अनेक जन दगावण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान तहसीलदार व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

डोंगर भागात असणाऱ्या कुरुंढे येथे ही भुस्खलन झाल्याची घटना घडली आहे. त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा संपर्क होत नसल्याने अनेकजण दगावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले गेले असल्याची भीती व्यक्त केली जात असून पूल वाहून गेल्याने संपर्क साधण्यास अडचणी निर्माण होत आहेत.दरम्यान घटनेची माहिती मिळताच आ. मकरंद पाटील,तहसीलदार रणजित भोसले, पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाडमध्ये दरड कोसळली; 32 घरे गेली मातीखाली

महाडमधील पूरस्थिती गंभीर; 10 हजारहून अधिक नागरिक पुराच्या विळख्यात, NDRFची टीम दाखल