in

विक्रोळी इथं दरड कोसळली; ३ जणांचा मृत्यू

शनिवारपासून होत असलेल्या पावसामुळे विक्रोळी आणि चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. विक्रोळी सूर्यनगर परिसरामध्ये तीन ते चार घरांवर दरड कोसळली आहे. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. अद्यापही या ठिकाणी आठ जण अडकले असल्यामुळे बचावकार्य सुरू आहे. घरांवर दरड कोसळल्यामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत.

त्याचप्रमाणे, रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबूर भागात मोठी दुर्घटना घडली आहे. पावसामुळे चेंबूरच्या भारत नगर भागातील झोपडपट्टीत भिंत कोसळली आहे. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरांचं नुकसान झालं आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 13 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली आहे. अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जखमींना राजावाडी तसंच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बचावकार्यासाठी NDRFची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai rain| चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली, 11 जणांचा मृत्यू

Karnataka CM: ‘मुख्यमंत्री पद सोडतो, पण तीन अटी मान्य करा’