in

लॉकडाऊनच्या भीतीनं LTT स्थानकावर परप्रांतीयांची मोठी गर्दी

राज्याच्या अंतर्गत भागांत रोजगारासाठी आलेल्या परराज्यातील, परगावातील नागरिकांनी पुन्हा एकदा परतीची वाट धरली आहे. दरम्यान आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनसवर परप्रांतीयांची मोठी गर्दी केली आहे.

काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेल्या करोनाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई शहर आणि उपनगरांत करोना रुग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासनाने शहरात कडक निर्बंध लागू केले.

गेल्या वर्षीच्या अनुभवाने धास्तावलेले कामगार, विद्यार्थी यांनी आपल्या मूळगावी धाव घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक गाड्यांतील पुढील काही दिवसांची आरक्षित आसनांची क्षमता संपली असून यातून रोज ३५ हजार प्रवाशी प्रवास करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोना स्थितीवरून सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाल्या…

पुणेकरांसाठी खूशखबर | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘म्हाडा’कडून 2 हजार घरांची सोडत