in

Video ; पिंजाळ व तानसा नद्यांनी सोडली पातळी

छाया- मच्छिंद्र आगिवले

चार ते पाच दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यां दुथडी भरून वाहू लागल्या असून अनेक ठिकाणी पुराच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाच्या आगमनाने शेतीची खोळंबलेली कामे पुन्हा जोमाने सुरू झाली असली तरी पुरमय वातावरण पुन्हा कामांना खीळ बसला आहे.

वाडा तालुक्यात शुक्रवारपासून पावसाने दमदार पुनरागमन केले असुन सोमवार व मंगळवारी मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. पिंजाळ नदी ही तालुक्यातील प्रमुख जलवाहिनी असून तिने रौद्ररूप धारण केले आहे.

पिंजाळ नदीच्या पात्रावरील पीक, मलवाडा, सापणे अशा अनेक गावांत पुराच्या पाण्याने धोका निर्माण झाला असून शिलोत्तर गावातील पुलावरून पाणी वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वाडा ते भिवंडी महामार्गावरील खड्डयांनी भीषण रूप धारण केले असून मेट गावाजवळ एक टेम्पो तर अनेक कार खड्ड्यात अडकून अपघातग्रस्त झाल्या आहेत.वाडा ते खोडाला मार्गावर दरड कोसळल्याने मार्ग बंद झाला होता मात्र माती व दगड बाजूला करण्यात आल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. या मार्गावर अजूनही धोका कायम असून भटक्यांनी धबधबे व नदीकडेला उगाच भटकू नये असा इशारा देण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वर्ध्यात ‘लालनाला’ धरणाचे ५ दरवाजे उघडले

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये “टायटन’ सर्वोत्तम