in

LGBT | मला लोकांची पर्वा नाही’ 87 वर्षांच्या आजीनं अभिमानानं स्वीकारलं ट्रान्सजेंडर नातीला

आजही आपल्या समाजात ट्रान्सजेंडर(Transgender) लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आजही या लोकांना सर्वसामान्य माणसांप्रमाणे वागणूक दिली जात नाही. त्यांना तुच्छतेची वागणूक दिली जाते. जुनी पिढी तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर, समलैंगिक (LGBT) अशा संकल्पना समजून घेण्यास तयार नसते. त्यांची मानसिकता आजही संकुचित आहे. मात्र एका आजीनं आपल्या ट्रान्सजेंडर नातीला स्वीकारत जुन्या पिढीतील बदलाचं उदाहरण समाजासमोर ठेवलं असून, संपूर्ण समाजाच्या डोळ्यातच अंजन घातलं आहे.


या आजीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच वायरल झाला आहे. 87 वर्षांच्या या आजीनं आपल्या जन्मानं मुलगा म्हणून जन्मलेल्या पण आता शस्त्रक्रिया करून मुलगी झालेल्या काली (Kali) या आपल्या ट्रान्सजेंडर नातीला खंबीर पाठिंबा दिला आहे. ‘मी 87 वर्षांची आहे. लोक काय म्हणतील याची मला पर्वा नाही. या, मी माझी नात, काली हिची ओळख करुन देते.’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चित्रकार अक्षय मेस्त्रींनी 16 विटांवर साकारली विठ्ठलाची मनमोहक कलाकृती

अमेरिकन टेनिसपटूला कोरोनाची लागण