in

LIC च्या कर्मचाऱ्यांचा होणार पगारवाढ

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आगामी आठवडाभरात केंद्र सरकार पगारवाढीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. एलआयसी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाने तत्वतः मंजुरी दिली असून, २० टक्क्यांपर्यंत पगारवाढ होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कर्मचाऱ्यांची यंदा पगारवाढ निश्चित मानली जात आहे. एलआयसी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या २० टक्के वेतन वाढीची शिफारस अर्थ मंत्रालयाला केली असून, येत्या आठवड्यात केंद्र सरकारकडून या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे.

मागील वेळी १७ टक्के वेतन वाढीचा प्रस्ताव देण्यात आला होता. याशिवाय गृहकर्जावर १ टक्का कपातीचा प्रस्ताव देण्यात आला होता. यंदा मात्र LIC कर्मचाऱ्यांना १८.५ टक्के ते २० टक्क्यांच्या दरम्यान पगारवाढ मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एलआयसीच्या कर्मचाऱ्यांचा १ ऑगस्ट २०१७ पासून वेतनवाढ झालेली नाही, अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्गुतंवणूक योजनेंतर्गत LIC मधील हिस्सा विकण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना केली होती. आगामी काही काळात LIC चा IPO येणार असल्याचे सांगितले जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CEC Sushil Chandra : देशाच्या नव्या मुख्य निवडणूक आयुक्तपदावर सुशिल चंद्रा यांची नियुक्ती

वर्ध्यात जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रेमडीसीविर उपलब्ध – जिल्हाधिकारी