in

LIVE | सचिन वाझे, मोहन डेलकर प्रकरणावरुन विधानसभेत गदारोळ

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली आहे. या सगळ्या प्रकरणात महत्वाची अशी स्कॉर्पिओ गाडीही सचिन वाझे यांच्याकडे चार महिने होती असा खळबळजनक खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवारी सभागृहात केला. इतके सगळे पुरावे असताना सचिन वाझे यांना अटक का होत नाही असाही सवाल फडणवीस यांनी केला. तर सत्ताधारी पक्षानेही भाजपचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येत नावे असणाऱ्यांना अटक होणार का असा सवाल केला. यानंतर सभागृहात गदारोळ झाला.

मनसुख हिरेन आत्महत्येचा तपास NIA करत आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब फडणवीसांनांनी वाचून दाखवला. ATS याबाबत तपास करुन सत्य समोर आणेल. त्यांच्याकडे काही पुरावे असेल, तर एटीएसकडे द्यावे. राज्य सरकार योग्य तपास करेल, कोणालाही पाठिशी घालणार नाही. शब्द देतो. जे कागदपत्रे आहेत, ती माझ्याकडे किंवा ATS कडे द्या. तपास योग्य होईल – अनिल देशमुख

मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणाची चौकशी SIT मार्फत करणार : अनिल देशमुख
मोहन डेलकर ‌आत्महत्या केली. त्यावर त्यांनी आक्षेप घेतलाय की प्रफुल खेडा पटेल हे मला त्रास देत होते. पटेल हे गृहमंत्री होते गुजरात राज्याचे. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. मोहन डेलकर यांच्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करणार – अनिल देशमुख

मनसुख हिरेन आत्महत्येचा तपास NIA करत आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब फडणवीसांनांनी वाचून दाखवला. ATS याबाबत तपास करुन सत्य समोर आणेल. त्यांच्याकडे काही पुरावे असेल, तर एटीएसकडे द्यावे. राज्य सरकार योग्य तपास करेल, कोणालाही पाठिशी घालणार नाही. शब्द देतो. जे कागदपत्रे आहेत, ती माझ्याकडे किंवा ATS कडे द्या. तपास योग्य होईल – अनिल देशमुख

सचिन वाझेवर गंभीर आरोप, शिवसेनेकडून वाचवण्याचा प्रयत्न : आशिष शेलार
सचिन वाझेना अटक व्हायला पाहिजे, सचिन वाझेना वाचवण्याचा प्रयत्न शिवसेना करताहेत.
डेलकरांच्या आत्महत्येची चौकशी व्हायला पाहिजे. डेलकरांच्या प्रकरणा मागे वाझेना वाचवू नका
सचिन वाझेवर गंभीर आरोप लागले आहेत : आशिष शेलार

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संजय लीला भन्साळींना कोरोनाची लागण

मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणाची चौकशी SIT मार्फत करणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा