in

…तर अनेक जेष्ठांचे प्राण वाचले असते – हायकोर्ट

‘इंग्लंडसारख्या देशांत केवळ लसीकरण केंद्रांमध्ये करोनाची लस देण्याची भूमिका सोडून कारमध्ये लसीकरण, घरोघरी लसीकरण केव्हाच सुरू झाले आहे. मग आपल्याकडे अजून त्याचा विचार का झाला नाही? आपल्याकडे केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करून निर्णय घेतला असता, तर विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह कित्येक वयोवृद्ध व्यक्तींचे प्राण कदाचित वाचले असते’, असे गंभीर निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले.

अॅड. धृती कपाडिया व अॅड. कुणाल तिवारी यांनी वयोवृद्ध, विकलांग व अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींसाठी घरोघरी लसीकरणाची विनंती जनहित याचिकेद्वारे केली आहे. ‘ज्येष्ठांसाठी ड्राइव्ह इन लसीकरणासारखे स्तुत्य उपक्रम सुरू झाले असले, तरी कित्येक वयोवृद्ध घराबाहेर पडूच शकत नाहीत. त्यांच्याकरिता घरोघरी लसीकरण आवश्यक आहे’, असे म्हणणे धृती यांनी बुधवारच्या सुनावणीत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर मांडले. तेव्हा, याप्रश्नी भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश आम्ही २२ एप्रिल रोजी दिलेले असताना केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात त्याविषयी काहीच स्पष्ट केले नसल्याकडे खंडपीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांचे लक्ष वेधले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भारतातील कोरोनावाढीचं कारण ‘WHO’नं सांगितलं

एकाच दिवसात वाघांच्या तीन बछड्यांचा मृत्यू