in

2 दिवसांनी लॉकडाऊन लागणारच; व्यावहारिक भूमिका घ्या…

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची आज व्यापारी आणि औद्योगिक वसाहतीमधल्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली. यावेळी हसन मुश्रीफ यांनी 2 दिवसांनी लॉकडाऊन लागणारच आहे. आपण व्यावहारिक भूमिका घेऊ, असं आवाहन व्यापाऱ्यांना केलं.

आम्ही राजकारण करणार नाही पण लस, रेमडिसिव्हीर कमी पडणार नाही याची काळजी मोदी साहेबांनी घेतली पाहिजे. मुख्यमंत्री गेले तीन-चार दिवस वेगळ्या घटकांची चर्चा करताहेत. पॅकेजबाबत योग्य तो निर्णय ते घेतील. इतके जीव गेल्यानंतर का होईना केंद्राने रेमडेसिव्हीरची निर्यात थांबवली. याबद्दल केंद्राचे आभार मानले पाहिजेत. दरेकर म्हणतात आम्ही केंद्रावर बोलतो, औषध लस याची कमतरता असताना आणखी काय केलं पाहिजे”

लॉकडाऊन किती, 8 की 14 दिवस?
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 11 एप्रिलला टास्क फोर्सची बैठक घेतलीय. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात 8 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. मात्र टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी निदान 14 दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असं मत मांडलं. त्यामुळे टास्क फोर्सचे तज्ज्ञ देखील लॉकडाऊनच्या बाजूने आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘या’ स्मार्टफोनवर मिळणार मोठा डिस्काउंट

#BoardExams2021 : दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या…