in

‘या’ देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा

जगभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत जात आहे. फ्रान्समध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याने अनेक नागरिक पुन्हा अडचणीत सापडले आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे फ्रान्समधील शाळा, महाविद्यालये कमीत कमी तीन आठवड्यांसाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लॉकडाऊनबाबत बोलता फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल म्हणाले की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता जर निर्बंध कडक केले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करा. या लॉकडाऊनदरम्यान केवळ अत्यावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी आहे. तसेच कार्यालयात जाण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करावे. याचबरोबर पुढील तीन आठवड्यांसाठी शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत.

फ्रान्समध्ये कोरोनाबाधित रुग्णांची एकूण आकडेवारी ४६.४६ लाखांवर पोहचली आहे. तर मृतांचा आकडा ९५ हजार ५०२ झाला आहे. त्यामुळे ब्रिटनहून आलेल्या नव्या स्ट्रेनमुळे फ्रान्समधील कोरोना स्थिती अत्यंत बिकट होत आहे. फ्रान्समध्ये गेल्या २४ तासात २९ हजार ५७५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जम्मू काश्मीरमध्ये भाजपा नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला

सरकारची लॉकडाउनची मानसिकता नाही- विजय वडेट्टीवार