in

LockDown in Goa | गोव्यात उद्या सायंकाळपासून लॉकडाऊन

गोव्यात कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने रुग्णालयांवर ताण येऊ लागल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात लोकडाऊनची घोषणा केली. उद्या गुरुवारी सायंकाळी ते सोमवारी सकाळी पर्यंत लॉकडाऊन असेल.

मुख्यमंत्री म्हणाले की लोकांनी काम नसताना बाहेर फिरू नये किंवा गर्दी करू नये असे सांगितले तरी लोक ऐकत नाहीत. त्यामुळेच चार दिवस गोव्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारने घेतला. चार दिवस गोव्यात पर्यटन बंद राहील. ज्या पर्यटकांनी गोव्यात खोली आरक्षित केली आहे त्यांनी येऊन खोलीतच रहावे. आम्ही राज्याच्या सीमा बंद केलेल्या नाहीत. सीमा खुल्या राहतील पण चार दिवस राज्यात कुठेच पर्यटक फिरू शकणार नाहीत.

मुख्यमंत्री म्हणाले की लॉकडाऊनमध्येही उद्योग सुरू राहतील. औषधालये व जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू राहील. मजुरांनी घाबरून जाऊ नये. सोमवारपासून सर्व काही सुरळीत सुरू होईल. गोव्यातील कसिनो जुगार केंद्रे, मद्यालये हे सारे बंद राहील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहील. नाईट कर्फ्यू पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे सुरू राहील.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CSK vs SRH:चेन्नई विरुद्ध हैदराबादमध्ये आज सामना

Free vaccination Maharashtra: महाराष्ट्रात मोफत लसीकरण करणार- राजेश टोपे