in

Maharashtra Lockdown | राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन; राजेश टोपेंनी दिले संकेत

राज्य सरकार 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे. या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संकेत दिले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे.

दरम्यान सात दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवावा, असं मत राज्यातील टास्क फोर्सने मांडलं होतं, मात्र 13 मे रोजी रमजान ईद असल्याने गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवावा असे काही मंत्र्यांचे मत आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करुन अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Free vaccination Maharashtra: महाराष्ट्रात मोफत लसीकरण करणार- राजेश टोपे

Covid19 Vaccination | कोविन वेबसाईट क्रॅश; वेबसाईटवर नोंदणीसासाठी नागरिकांची गर्दी