in ,

Lokshahi Impact; लोकशाहीच्या बातमीनंतर पोलीस प्रशासन जागे; पोलिसांनी गुंडाला केले जेरबंद

प्रशांत जगताप | साताऱ्यातील गुंड वैभव जाधव याने गाडीच्या बोनेटवर बसून तलवारीने केक कापल्याची बातमी लोकशाही न्यूजने प्रसिद्ध केली होती. या बातमीनंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून अवघ्या काही तासातच गुंड वैभव जाधवच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

साताऱ्यातील चंदननगर येथील गुंड वैभव जाधव याने मध्यरात्री मित्रांसोबत गाडीच्या बोनेटवर बसून तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला होता. यावेळी त्याने कोरोना नियमांचे उल्लंघन तसेच अवैधरित्या शस्त्र बाळगल्याच्या बातमी लोकशाही न्यूजने प्रसिद्ध केली होती.

लोकशाही न्यूजने बातमी प्रसारित करताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. आणि अवघ्या एका तासात तपासाची चक्रे फिरवत गुंड वैभव जाधव यांच्या मुसक्या सातारा शहर पोलिसांनी आवळल्या.त्याच्यासह अन्य 10 ते 12 साथीदारांवर जिल्हाधिकारी आदेशाचे उल्लंघन आणि अवैधरित्या शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान गुंड वैभवचे काही साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस

तांबडी नदी ओवरफ्लो; गावात शिरले पाणी