in

कुंभमेळ्यात सहभागी निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचं कोरोनामुळे निधन

देशात कोरोना रुग्णांचा स्फोट होत आहे. हरिद्वार येथील कुंभमेळ्यात मध्यप्रदेशहून आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे करोना संसर्गामुळे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महामंडलेश्वर कपिल देव हे कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यावर त्यांना देहरादून येथील कैलाश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणीच त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं.

हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे मोठ्याप्रमाणावर उल्लंघन झाले. हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे मोठ्याप्रमाणावर उल्लंघन झाले होते. मागील ७२ तासांमध्ये दीड हजारांहून अधिक पॉझिटिव्ह लोक केवळ हरिद्वार कुंभ मेळा परिसरातू समोर आल्या आहेत. शिवाय अनेकांचा मृत्यू देखील झालेला आहे. करोनाबाधितांची संख्या आता आणखी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. समाजातील अनेक स्थरातून याबद्दल विरोध दर्शवण्यात आला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सावित्रीबाई फुले विद्यापीठ 30 एप्रिलपर्यंत बंद

आशिकी फेम राहुल रॉय कोरोना पॉझिटिव्ह