in

Maharashtra bandh | मुंबईत 8 बसेसची तोडफोड

उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या बंदच्या वेळी मुंबईत 8 बेस्टच्या बसेसची तोडफोड करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. परिणामी बस आगारासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केली जात आहे. दरम्बेयान बेस्टच्या वतीने मुंबईच्या रस्त्यावर तुरळक बेस्टच्या बसेस सध्या धावत आहेत

9 ऑक्टोबर रोजी तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा, सोमवारी व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मविआकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, एपीएमसी मार्केटही बंद

‘बंद संपूर्णत: यशस्वी; देशाची लढाई महाराष्ट्र लढतोय’