in

मविआचे खासदार संसदेत शेतकरी विरोधी विधेयक मंजूर होत असताना शेपूट घालून का बसले होते?

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aghadi) शेतकरी विरोधी कायदे व लखीमपूर खेरी इथल्या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’वर (Maharashtra Bandh) भाजप पाठोपाठ आता मनसेनंही (MNS) टीका केली आहे. यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी या बंदवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘लखीमपूरला घडलेली घटना दुर्दैवीच आहे. त्याचा निषेध झालाच पाहिजे, पण ज्या कृषी कायद्यांमुळं हे सगळं घडतं आहे, ते कृषी कायदे होत असताना संसदेत महाविकास आघाडीचे खासदार संसदेत शेपूट घालून का बसले होते? शिवसेनेच्या खासदारांची थोबाडं बंद का होती? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यसभेत अनुपस्थित का होते?,’ अशी प्रश्नांची सरबत्तीच संदीप देशपांडे यांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अनिल देशमुखांच्या नागपूरच्या घरी सीबीआयचे छापेमारी

Maharashtra Bandh | शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतल ताब्यात