in

Maharashtra Band | जळगावात सेनेच्या महिला कार्यकर्त्यांची दादागिरी; वस्तू घेऊन पळ काढल्याचा दुकानदाराचा आरोप

मंगेश जोशी, जळगाव | राज्यात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद केला असताना तिकडे जळगावात आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांची दादागिरी समोर आली आहे. दुकानातून शीतपेय व खाद्यपदार्थ घेऊन पैसे न देताच पळ काढल्याचा दुकानदाराने आरोप केला आहे. तर शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांची पैसे दिल्याचे म्हणत हा आरोप फेटाळला आहे.

जळगावात महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान नवीपेठेत शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी एका आईस्क्रीम पार्लरमधून शीतपेय व खाद्यपदार्थ खरेदी केले. मात्र या खरेदी केलेल्या वस्तूची किंमत दुकानदाराला दिली नाही. तसेच आपल्या चारचाकी गाडीच्या बोनेटवरून त्याला धक्का देत नेल्याचा आरोप दुकानदाराने केला आहे.

दुकानदाराने दिलेल्या माहितीनूसार, चार लस्सी, दोन दुधाच्या बाटल्या अमुल कूलच्या आणि उपासाचा चिवडा असा संपुर्ण 190 रूपयांचा माल शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी घेतला. गाडीतून पैसे आणून देते असे म्हणत ती गेली आणि गाडीच्या काचवर करून निघुन जात होत्या. यावेळी गाडीजवळ जाऊन पैशाची मागणी केली असता पैसे देत नाही म्हणे असे म्हणत पळ काढल्याचा दुकानदाराने आरोप केला.

या दरम्यान दुकानदाराने पैसे मागितल्यानंतर कारमधून कार्यकर्त्यांचा पळून जाण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करताना सुदैवाने कारखाली येण्यापासून वाचला दुकानदार, पायाला झाली गंभीर दुखापत झाली आहे. तर शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी दुकानदाराचे आरोप फेटाळून लावला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना देणार एकरकमी एफआरपी

चंद्रपूर मनपाच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे संदीप आवारी बिनविरोध