in

महाराष्ट्र बंद, काय सुरू राहील, काय बंद?

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरीत शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या महाविकास आघाडीनं आज (11 ऑक्टोबर) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिलीय. 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘महाराष्ट्र बंद’ हाक दिली.

“आपल्या अन्नदात्यासाठी हा बंद आहे. व्यापाऱ्यांनी आणि सामान्यांनी स्वतःहून बंदला पाठिंबा द्यावा. तसेच बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत,” अशी माहिती यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली होती.

लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही या बंदच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलं.

“लखीमपूर खिरीत जे घडलं, ती देशाच्या संविधानाची हत्या आहे, कायद्याची पायमल्ली आहे. अन्नदाता शेतकऱ्याला संपवण्यासाठीचं षड्यंत्र आहे. केंद्र सरकारची अमानुषता इतकी आहे की, राज्या-राज्यात ते लखीमपूर खिरीसारख्या घटना घडवतील. अशा घटनांविरोधात आम्ही आहोत,” हे सांगण्यासाठी आम्ही बंद पुकारला आहे, असं संजय राऊत म्हणाले.

काय सुरू, काय बंद?

  • राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान कुठल्या गोष्टी सुरू राहतील, याची माहिती दिली.
  • हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर, रुग्णवाहिका, दूध पुरवठा इत्यादी गोष्टींसह अत्यावश्यक आणि जीवनावश्यक गोष्टी सुरूच राहीतल.
  • अत्यावश्यक सेवांना कुठलीच बाधा आणायची नाही.
  • दुकानदारांनी या ‘महाराष्ट्र बंद’ला स्वत:हून पाठिंबा दिला पाहिजे, असं आवाहनही नवाब मलिक यांनी केलं.
  • तसंच, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते लोकांना हात जोडून विनंती करतील की, शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आपली दुकानं, कामं बंद ठेवावीत, असं मलिक म्हणाले.

कुणा-कुणाचा ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा?

  • महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी हा ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिलीय.
  • यात महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्ष आणि संघटनांनीही पाठिंबा जाहीर केलाय.
  • यात आम आदमी पक्ष, सीपीआय, सीपीएम, समाजवादी पक्ष, शेकाप, किसान सभा, कामगार संघटना, लाल निशाण पक्ष, युवक क्रांती दल, अखिल भारतीय किसान समिती यांसह इतर पक्ष आणि संघटनांचा सहभाग आहे.
  • पुणे व्यापारी फेडरेशनच्या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आलं की, 11 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शॉर्टसर्किटमुळे चार एकर ऊस जळून खाक

‘महाराष्ट्र बंद’च्या पूर्वसंध्येला कोल्हापुरात कॅन्डल मार्च