in

Maharashtra Corona | राज्यात २ हजार २९४ नवे बाधित

राज्यात आज दिवसभरात २ हजार २९४ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, १ हजार ८२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय, २८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात पुन्हा एकदा दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांची संख्याही आज कोरोनामधून बरे झालेल्यांच्या तुलनेत अधिक आढळून आली आहे. आज १ हजार ८२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत एकूण ६४,०१,२८७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.३२ टक्के एवढे झाले आहे.

२ हजार २९४ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,७७,८७२ झाली आहे. २८ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. आता पर्यंत १३९५४२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.राज्यात आज रोजी एकूण ३३,४४९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अन्यथा पुन्हा लॉकडाऊन, छगन भुजबळांचा इशारा

राज्यपाल गडचिरोली दौऱ्यावर