in ,

Maharashtra Corona : राज्यात आज 59 हजार नवे कोरोना रुग्ण

राज्यात आज नवीन कोरोना बाधितांचा आकडा हा 58 हजार 952 वर पोहोचला आहे. तर 278 मृत्यूंची नोंद आज झाली आहे. दरम्यान राज्यात आज मध्यरात्रीपासून येत्या 15 दिवस कठोर संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे या निर्णयामुळे कोरोणाची रुग्णवाढ थांबेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्यात आज दिवसभरात तब्बल 58 हजार 952 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधितांचा आकडा 35 लाख 78 हजार 160 इतका झाला आहे. तर सध्या राज्यात 6 लाख 12 हजार 070 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज 39 हजार 624 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 81.21 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. आज एकूण 278 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 58 हजार 804 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मृत्यूदर सध्या 1.64 टक्के इतका आहे.

मुंबईत 9 हजार 925 कोरोनाबाधित

मुंबईत आज 9 हजार 925 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 लाख 44 हजार 942वर पोहोचली. तर 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 9 हजार 273 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत 87 हजार 443 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

पुण्यात 4 हजार 206 रुग्ण

पुण्यात आज 4 हजार 206 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 लाख 44 हजार 029 इतकी आहे. तर दिवसभरात 4 हजार 895 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 2 लाख 84 हजार 801 इतकी आहे. आज 66 रुग्णांचा मृत्यू झाला असून यामधील 20 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona : उस्मानाबादेत एकाचवेळी 19 मृतदेहांवर अंत्यसंस्कार, तरीही मृतदेह रांगेत…

‘भगव्याला हात लावाल तर दांडा घालू’, संजय राऊतांचा कन्नडिगांना इशारा