महाराष्ट्रात कोरोना रुग्णसख्या झपाट्याने वाढत चालली आहे. आज तब्बल नवीन रुग्णसंख्या थेट 60 हजारानजीक पोहोचली आहे. त्यामुळे राज्य सरकारसह आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
राज्यातल्या आजच्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात 59 हजार 907 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 31 लाख 73 हजार 261वर गेला आहे. यापैकी 5 लाख 01 हजार 559 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
आज नवीन 30 हजार 296 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 26 लाख 13 हजार 627 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.36% झाले आहे. तब्बल 322 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद दिवसभरात झाली आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 56 हजार 652 एवढा झाला आहे.
मुंबईत 10 हजार नवे कोरोना रुग्ण
मुंबई कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मंगळवारप्रमाणे आजही कोरोना रुग्णसंख्या 10 हजाराच्या पार गेली. तब्बल 10 हजार 428 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या 4 लाख 82 हजार 760 वर गेला आहे. तर आज 6 हजार 7 रुग्ण एका दिवसात कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या 3 लाख 88 हजार 011वर गेली आहे. 23 रुग्णांचा आज मृत्यु झाला असून एकूण मृतांची संख्या 11 हजार 851 वर गेली आहे. तसेच सध्या मुंबईत 81 हजार 886 रुग्ण उपचार घेत आहेत.
Comments
Loading…