in

राज्यात आज ‘एवढ्या’ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 43, 211 नव्या रुग्णांची भर झाली असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 33, 356 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात अधिक रुग्णांची भर पडल्याचं दिसून येतंय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे.

राज्यात आज 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.98 टक्के झाला आहे. राज्यात आत्तापर्यंत 67 लाख 17 हजार 125 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.28 टक्के आहे. राज्यात आज 238 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आत्तापर्यंत 1605 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 859 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

St Employee Strike | एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, खासगी चालकांना घेणार

Uttar Pradesh election : अडीच हजार ‘सपा’ कार्यकर्त्यांविरोधात FIR दाखल