in ,

Gudi Padwa 2021 : गुढीपाडव्यासाठी राज्य सरकारने जारी केली नियमावली


गुढीपाडवा सणानिमित्त राज्य सरकारनं नवीन नियमावली जारी केलीय.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा सण साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं आदेशा काढले आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही 13 एप्रिल 2021 रोजी गुढीपाडवा सण साजरा केला जाणार आहे. राज्यात काही ठिकाणी गुढीपाडवा हा सण पारंपरिक वेशभूषा परिधान करून आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येतो. मात्र कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी या सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

गुढीपाडवा सणाच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/ रक्तदान शिबिरे स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने आयोजित करता येतील. तसेच स्वच्छतेबाबत जनजागृतीही करता येईल. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना कोविड विषयक सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही.

काय आहे नियमावली ?

  • सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करणे अपेक्षित आहे.
  • कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी.
  • सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये
  • सोशल डिन्स्टन्सिंगचे आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून घरगुती गुढी उभारून सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बेड्स असतानाही रुग्ण रांगेत का उभे आहेत? उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारलं

Sputnik V vaccine | भारतात रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीला मंजुरी