in ,

Maharashtra Corona; राज्यात १४ हजार १५२ रुग्ण कोरोनाबाधित; रिकव्हरी रेट ९४.८६ टक्के

राज्यात कोरोनाचा आलेख खालावत चालला आहे. नवीन बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. राज्यात आज २० हजार ८५२ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामुळे राज्यसरकारसह आरोग्य विभागासाठी ही दिलासादायक बातमी आहे.

राज्यात आज १४ हजार १५२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, २० हजार ८५२ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण ५५,०७,०५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९४.८६ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण १,९६,८९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दिवसभरात २८९ रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७ टक्के एवढा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लस न घेता घराबाहेर फिराल, तर दंड! औरंगाबाद प्रशासनाचा प्रस्ताव

मंत्री आदित्य ठाकरेंची बैठक सुरू असताना स्लॅब कोसळला…