in

Maharashtra Corona: दिलासा… कोरोना बाधितांच्या संख्येत घट

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातल्यानंतर अखेर बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. दिवसाला ५० ते ६० हजार नव्या रुग्णांची भर पडू लागली होती. तसेच, दिवसाला ८०० ते ९०० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे दिवस देखील राज्याने पाहिले.

आज दिवसभरात राज्यात २१ हजार २७३ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. हे प्रमाण गेल्या काही दिवसांत ६० हजारांवरून २१ हजारांवर आलं आहे. त्यासोबतच आज दिवसभरात ३४ हजार ३७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ५२ लाख ७६ हजार २०३ इतका झाला आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९३.०२ टक्के इतका वाढला आहे!

गुरुवारी राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आज दिवसभरात ४२५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच, गेल्या आठवड्याभरात हे प्रमाण सातत्याने ५००च्या वर राहिलं आहे. त्यामुळे प्रशासनासाठी मृत्यूंची संख्या कमी होणं ही दिलासादायक बाब ठरली आहे. राज्याचा सध्याचा मृत्यूदर १.६३ टक्के इतका आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वैद्यकीय शिक्षण विभागात १५ ते २० हजार पदं भरणार – अमित देशमुख

मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला डोमिनिका कोर्टाची स्थगिती