in

कोरोनाचा कहर सुरूच… दिवसभरात ६६, ३५८ कोरोनाबाधित, तर ८९५ मृत्यू

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या चोवीस तासांत राज्यात ६६,३५८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये देखील वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ८९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

मागील चोवीस तासांत राज्यात ६६,३५८ नव्या रुग्णांची वाढ झाली. तर दुसरीकडे ६७,७५२ जणांनी कोरोनावर मात केली. राज्यात सध्या ६ लाख ७२ हजार ४३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८३.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ३६ लाख ६९ हजार ५४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“मुंबईतील मृत्यूंचा आकडा लपवला जातोय”, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

रामलीला मैदानात उभारणार 1000 बेडचे रूग्णालय, दिल्ली सरकारचा निर्णय