in

राज्यातील रुग्णसंख्येत घट, रिकव्हरी रेट वाढला

देशभरातील दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र असून महाराष्ट्रातील परिस्थिती देखील सुधारत आहे. राज्याती रिकव्हरी रेट ९५.७६वर गेला असून रुग्णसंख्येतही घट झाली आहे.

त्यामुळे रुग्णसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.७६ टक्के एवढं झालं आहे. राज्यात एका दिवसात ९ हजार १०१ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५७ लाख १९ हजार ४५७ इतकी झाली आहे.

तर दुसरीकडे मागच्या २४ तासात ९ हजार ३६१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच १९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९७ टक्के इतका आहे. राज्यात सध्या १ लाख ३२ हजार २४१ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत ३ कोटी ९५ लाख १४ हजार ८५८ जणांची करोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५९ लाख ७२ हजार ७८१ जणांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…ही वाक्य कानावर पडेल तो सुवर्ण दिवस असेल”

मालाडमध्ये लाकडाच्या वखारीत भीषण आग