in

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात ९ हजार नवे कोरोनाबाधित, तर १८० रुग्णांचा मृत्यू

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस पुन्हा वाढ होत आहे. तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना राज्यात आज दिवसभरात ९ हजार नवीन करोनाबाधित आढळून आले असून, १८० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

तर, ५ हजार ७५६ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. शिवाय, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. मागील काही दिवसांपासून दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही कोरोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा कधी जास्त तर कधी कमी आढळून येत आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५९,८०,३५० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.२४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रत्नागिरी | पुराच्या पाण्यात पोहणं बेतलं जीवाशी, संगमेश्वरमध्ये दोघांचा बुडून मृत्यू

IND vs SL | टीम इंडियाची दमदार सलामी… श्रीलंका बेचिराख!